पंढरपूर प्रतिनिधी
दिनांक 28 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने स्थळ वाशिम वाटाणे लोन येथे संपन्न.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अधिवेशन 2026 वाशीम येथे मोठ्या उत्साहात संपन्न व पत्रकारांना पुरस्कार सोहळा गणेश सुरजसे पत्रकार जिल्हाध्यक्ष अकोला यांना राज्यस्तरीय संघटक पुरस्कार प्राप्त. सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. व पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री राजेंद्र कोरके पाटील यांना पश्चिम महाराष्ट्राचा संघटनात्मक पुरस्कार सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे महासचिव डॉक्टर विश्वासराव आरोटे तथा नवनाथ जाधव प्रदेश प्रसिद्धीप्रमुख तथा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्ष व विभागीय अध्यक्ष यांना सन्मानित करण्यात आले. अनेक महात्मे महाराज तसेच गुरुदेव सेवा संस्थाची तुकडोजी महाराज यांचे अनेक शिष्यसह मान्यवर मोठ्या संख्येने कार्यक्रम स्थळी उपस्थित होते. यांनी सर्वांचा सन्मान करून प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आयोजक निलेश सोमानी वाशिम प्रदेश कार्याध्यक्ष यांना व त्यांच्या संपूर्ण टीम ने केलेले हे विशेष पण त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातील पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष, तसेच जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष, असंख्य संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सोलापूर जिल्ह्यातून पंढरपूर तालुक्यातून पंढरपूर तालुकाध्यक्ष रोहन नरसाळे, पंढरपूर शहर कार्याध्यक्ष नितीन करंडे, तालुका कार्याध्यक्ष अतुल मोरे, रामदास नागटिळक, संतोष मोरे, प्रमोद भोसले, शंकर कदम, राजेंद्र करपे, लक्ष्मण शिंदे, कुमार कोरे, गणेश माने, राजेश बदली पाटील, धनाजी राक्षे, स्वागत खपाले, महेश कदम, विक्रम कदम इत्यादी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments